मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे तीन तेरा - Sikho Sikhao

Friday, August 7, 2020

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे तीन तेरा

या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन एप्लीकेशन केले पैसे सुद्धा भरले पण तरीही आज त्या शेतकऱ्यांना पंप मिळत नाही असं का होतय त्याची कोणी ऐकून घेत नाही कोणाकडे जावे कोणाकडे चौकशी करावी याचीसुद्धा माहिती शेतकऱ्यांना आत्तापर्यंत नाही काही शेतकऱ्यांना याबद्दल माहिती असेल ही योजना महावितरण मार्फत चालवण्यात येत आहे काही शेतकरी महावितरण ऑफिस ला भेट देतात पण तिथेही त्यांना निराशाच हाती येते जाब विचारण्याचा प्रश्नच नाही शेतकऱ्यांना पंप किती दिवसात मिळाला पाहिजे याबद्दलही शेतकऱ्यांना माहिती नाही Technical Supports यूट्यूब चैनल ( या चॅनल ला नक्की भेट द्या ) ने याबद्दल शेतकऱ्यांना जागृत केले कशा प्रकारे अर्ज करायचे कशा प्रकारे अर्जाची छाननी होते तक्रार कुठे करायची कंपनी कशी निवडायची पैसे कसे भरायचे अशा या बाबीवर या यूट्यूब चैनल ने सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे

योजना सुरू झाली तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांना कंपनीवाले मटेरियल घेण्यासाठी त्यांच्या गोडाऊनला बोलवत असत मटेरियल वाहून नेण्याचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागत असे त्याच्या वरही टेक्निकल सपोर्ट यांनी आवाज उठवला आणि शेतकऱ्यांना त्यांचे मटेरियल त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यास भाग पाडले


 वाळू , सिमेंट, खडी याचे सुद्धा पैसे कंपनी वाले देत नसत त्यावेळी शेतकऱ्यांचे वाळूचे सिमेंटचे आणि खड्ड्याचे पैसेसुद्धा कंपनीला देण्यास भाग पाडले पण आजही बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत आपण ही पोस्ट वाचत असाल तर टेक्निकल सपोर्ट चॅनल ला सबस्क्राईब करा आणि एक आवाज तयार करा तो आवाज ह्या कंपनी वाल्या पर्यंत आणि सरकार पर्यंत आणि महावितरण या पर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल


 आजही 30 टक्के शेतकऱ्यांना त्यांचे पंप मिळाले नाहीत त्याच्यावरती आवाज उठवण्यात कोणीही तयार नाही महावितरण तर त्याच्याकडे लक्ष देत नाही प्रत्येक वेळी शेतकरीच का कंपनी वाल्यांना विचारले असता कंपनीवाले उडवाउडवीची उत्तरे देतात खरंतर ऑनलाइन पेमेंट केलं असता किंवा ऑफलाईन पेमेंट केले असता आपल्याला त्या तारखेपासून 90 दिवसात आपलला पंप आपल्या शेतात इन्स्टॉल झाला पाहिजे नाहीतर नियमाप्रमाणे  कंपनीकडून शेतकऱ्यांना शंभर रुपये रोज याप्रमाणे दंड आकारला जातो पण त्यावरती ही कोणी कोणी म्हणजे महावितरण याकडे अजिबात लक्ष देत नाही

आज ज्या शेतकऱ्यांचे पंप त्यांच्या शेतात इन्स्टॉल झाले आहेत अशा शेतकऱ्यांनाही आज पंपा बाबत भरपूर प्रॉब्लेम आहेत याकडेही कुणी लक्ष देत नाही शेतकऱ्यांचे पंप खराब झाले आहेत त्याकडेही कोणाचे लक्ष नाही कंपनीच्या टोल फ्री नंबर ला फोन केला असता त्यांच्याकडूनही काही समस्या निवारण केली जात नाही महावितरण यांच्या कडून SMS द्वारे शेतकऱ्यांना सांगितले आहे की काही प्रॉब्लेम आल्यास आपण महावितरणकडे तक्रार करू शकता पण याबाबत महावितरण झोपलेले आहे महावितरणकडून याबाबत कसलीही तक्रार घेतली जात नाही किंवा या कंपनी वाल्या वर काही ऍक्शन घेतली जात नाही

प्रत्येक वेळी शेतकरी दाबला जातो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता एकत्र येण्याची गरज आहे आपण एकत्र येऊन या योजना आपल्या पदरात पाडून घेऊ शकतो यशस्वीरित्या तर चला मग आपण एकत्र येऊ या योजनेबद्दल Technical Supports चैनल मे सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा धन्यवादNo comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?